Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोपडा बस स्थानकात समस्येबाबत ; कॉंग्रेसचे निवेदन
    चोपडा

    चोपडा बस स्थानकात समस्येबाबत ; कॉंग्रेसचे निवेदन

    editor deskBy editor deskSeptember 25, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतीनिधी

    महाराष्ट्र राज्य वाहतूक परिवहन महामंडळ चोपडा आगार येथे एन.एस.यू.आय.च्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील व तालुकाध्यक्ष काँग्रेस चोपडा प्रा.प्रदीप पाटील व परिवहन सेल उत्तर महाराष्ट्र देवकांत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रदेश सचिव एन एस यु.आय. काँग्रेस महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

    चोपडा बस स्थानकात अत्यंत अस्वच्छता दिसून येत आहे या अस्वच्छतेमुळे प्रवाशांना व एस.टी. कर्मचाऱ्यांना अत्यंत त्रास होत असल्याने या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती नाकारता येऊ शकत नाही, तरी आपण याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी आणि महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनची एस.टी. बस वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना व त्या सोबतच प्रवाशांना ही अत्यंत त्रास होत आहे. त्यामुळे एस.टी. बसेस फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू कराव्यात अशी आपणास विनंती निवेदन देण्यात आले.

    यावेळी एन.एस.यू.आय. कडून प्रवाशांना व विद्यार्थ्याना सूचनात्मक विनंती करण्यात आली की आपण सर्व आपले हक्कासाठी मागण्या करतो परंतु आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत एस टी महामंडळ बस स्थानकावर स्वच्छता राखण्यास आपणही सहकार्य करावे. यावेळी तालुकाध्यक्ष एन एस यू आय सोहन सोनवणे, एस.आर.ओ. घनश्याम पाटील, महाविद्यालयीन प्रमुख गोपाल धनगर, सपना बोरसे,प्रिया साळुंखे,प्रियांका सोनवणे, देवश्री बोरसे,सीमा कोळी,यामिनी साळुंखे,मोहिनी सोनवणे,हेमंत पाटील,समाधान काविरे, विवेक जाधव,आदित्य साळुंखे,अमंत कढरे, मयूर पाटील,उदय धनगर,रोहन जाधव,निखिल पाटील,कुणाल पारधी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.