जळगाव : प्रतिनिधी
दि. २४ सप्टेंबर रोजी “फार्मासिस्ट डे” व “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन जळगाव या संस्थेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. चंद्रकांत गवळी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी विजयेंद्र फाउंडेशनच्या डॉ. पराग चौधरी (हृदय रोग तज्ञ) व डॉ. जयंती चौधरी (स्त्री रोग तज्ञ) यांनी अशोकाची झाडे व औषधी झाडे संस्थेस वृक्षारोपणासाठी भेट दिली.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी शासकीय निवासस्थानी किमान १०० झाडे लावून जगवण्याचा संकल्प, ओसाड जागी पोलीस बांधवांच्या मदतीने वृक्षारोपण करण्याचा संकल्प अशा प्रकारच्या त्यांनी केलेल्या कामाची माहिती याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिली व त्यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेचे प्राचार्य डॉ. पराग पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी नियोजनबद्ध वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी मा. संतोष सोनवणे (पोलीस निरीक्षक, राखीव पोलीस दल), प्रीतम चौधरी (पोलीस निरीक्षक, विशेष सुरक्षा विभाग), राजीव फुलसिंग जाधव (विशेष सुरक्षा दल), सोपानराव पाटील (ड्रिल इन्स्पेक्टर), निर्भया पथकाच्या महिला सदस्या, डॉ. संजय पाटील (वैद्यकीय अधिकारी, कोरोना तपासणी केंद्र), शरद वंजारी, वीरेंद्र शिंदे, कवित्री रीता राजपूत, मणियार विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका बिजासिंनी यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते
शासकीय तंत्रनिकेतन जळगांव या संस्थेचे उपप्राचार्य डॉ. पी. पी. चौधरी, प्रा. कैलास वानखेडे (विभाग प्रमुख, उपयोजित यंत्रशास्त्र विभाग तथा सामाजिक उपक्रम समन्वयक), डॉ. प्रशांत अरगडे (विभाग प्रमुख, औषध निर्माण शास्त्र विभाग), प्रा. सुनिल कोठावदे (विभाग प्रमुख, विद्युत विभाग), प्रा. चंद्रशेखर भोळे (विभाग प्रमुख, उपयोजितशास्त्र विभाग), प्रा. हर्षल नेमाडे (विभाग प्रमुख, माहिती तंत्रज्ञान), प्रा. के. जी. पाटील (कर्मशाळा अधिक्षक) व संस्थेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. आंधळे, प्रा. डॉ. कहाळे, श्री रंधे, श्री मोरे, श्री तांबट, श्री नंदु पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी औषध निर्माण शास्त्र विभागाचे विद्यार्थी व पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी मान्यवरांचे स्वागत केले व वृक्षारोपणाच्या वेळी श्रमदानही केले.