Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तो आला बुरखा घालून प्रेयसीला भेटायला पण नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून…
    क्राईम

    तो आला बुरखा घालून प्रेयसीला भेटायला पण नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून…

    editor deskBy editor deskSeptember 24, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    मुलं पळवणारी टोळी समजून मारहाणीच्या घटना सध्या राज्यात खूप वाढल्या आहेत. तर सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळीचा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिक प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघत असल्याचे दिसून येत आहे. यावर पोलीस प्रशासनातर्फे खोटी अफवा असल्याचे आवाहनही करण्यात आली आहे.

    नाशिकमध्ये आठवडाभरात पाच जणांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या तरुणाला नागरिकांनी मुलं चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरातील मारहाणीच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच ही घटना घडल्याने पोलीस दलाची चिंता वाढली आहे. नाशिकच्या येथे इंदिरानगर येथे प्रेयसीला बुरखा घालून भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

    नाशिकच्या गंजमाळ येथेही बॅग पळवण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना मुलं पळवणारी टोळी समजून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या वेळी घडली होती. मागील आठवड्यात टाकळी रोड परिसरात ब्लँकेट विक्रेत्यांनी आपल्याशी खेळत असलेल्या मुलांनी खोडसाळपणा केल्याने बाचाबाची झाली त्या दरम्यान नागरिकांनी मुलं पळवणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण केली होती.

    आठवडाभरातच या तीन घटनांमध्ये पाच जणांना सोशल मीडियाच्या व्हायरल मेसेजने बेदम मारहाण खाण्याची वेळ आली, तिन्हीही घटनांमध्ये पोलीसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे. इंदिरानगर येथील घटनेत तर पोलीसांचे पेट्रोलिंग सुरू असल्याने घटना लागलीच लक्षात आली अन्यथा तिथिल नागरिकांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती. सोशल मीडियावर मुलं पळवणाऱ्या फेक मेसेजला मोठे पेव फुटले आहे, अनेक जन तो व्हायरल करत असल्याने त्याचा इतरांनाच मोठा फटका बसू लागला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.