जळगाव प्रतिनिधी: शहरातील अतिक्रमण असो हॉकर्सबाबत मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सिंघम म्हणूम ओळख निर्माण झाली होती त्याची मुबई येथे उपसंचालक पदी बदली झाली आहे.
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील राज्यातील ६ अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांचाही समावेश आहे. यात जळगांव शहर महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांची मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात उपसंचालक, वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव माधवी गांधी यांनी काढले आहेत. मनपात मुख्य लेखा परीक्षक म्हणून असलेले संतोष वाहुळे यांच्याकडे उपायुक्त पदाचा देखील पदभार होता. जळगाव शहरातील अतिक्रमण हटाव आणि हॉकर्सवर केलेल्या कारवाईने ते नेहमी चर्चेत राहिले होते. शहरातील गाळे सील करण्याच्या कारवाईत पुढाकार घेत असल्यानेच वाहुळे यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.