जळगाव : प्रतिनिधी
जळके ता.जळगाव येथे दिनांक २५सप्टेंबर रविवारी विठ्ठल मंदिर येथे रमेश आप्पा मित्र परिवार तर्फे रमेश पाटील अध्यक्ष संजय निराधार समिती जळगाव यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, अपंग, मुकबधीर अशा व्यक्तींसाठी प्रमाणपत्र मिळणेसाठी शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या शिबिरात अंध, अपंग मुकबधीर अशा व्यक्तींनी येतांना आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स तसेच अपंगत्वाचे फोटो/पासपोर्ट फोटो सोबत आणावे या शिबिरात आँनलाईन नोंदणी केली जाणार असुन नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना जळगाव शासकीय रुग्णालय येथे तपासणीसाठी बोलवण्यात येईल त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरपोच अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
रमेश पाटील यांचा वाढदिवस १८सप्टेंबर रोजी होता मात्र त्यादिवशी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रावसाहेब (सदानंद) माधवराव पाटील यांचे निधन झाल्यामुळे सदर कार्यक्रम थांबवण्यात आला होता अशी माहिती रमेश आप्पा मित्रपरिवार यांनी दिली तरी म्हसावद गटातील व गणातील सर्व अंध अपंग व मूकबधिर लाभार्थ्यांनी आयोजित शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान रमेश आप्पा मित्र परिवारातर्फे करण्यात येत आहे