जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील हिवरखेडा येथील विवाहितेला माहेरून ५० हजार रुपये आणावे यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण केल्याची घटना घडल्याने विवाहितेने जामनेर पोलीस स्थानकात सासरच्या चौघाविरोधात स्त्री अत्याचाराचा गुन्हा नोंद केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिवरखेडा येथील एका २८ वर्षीय विवाहितेचा लग्न झाल्यानंतर ४ वर्षापासून माहेरून घर बाधण्यासाठी ५० हजार रुपये आणावे यासाठी पती गजानन गोपाल कोळी, सासरे गोपाल काशिनाथ कोळी, सासू यशोदाबाई गोपाल कोळी, दीर निवृत्ती गोपाल कोळी सर्व रा. हिवरखेडा ता.जामनेर हे विवाहितेचा पैश्यासाठी मानसिक, शारीरिक छळ तर पती हा दारूच्या नशेत मारहाण व शिवीगाळ करीत असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादी उल्लेख केला आहे. याप्रकरणी रेखा गजानन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलीस स्थानकात संशयित आरोपी पती गजानन गोपाल कोळी, सासरे गोपाल काशिनाथ कोळी, सासू यशोदाबाई गोपाल कोळी, दीर निवृत्ती गोपाल कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामदास कुंभार हे करीत आहेत.