• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्याचा तिघांचा प्रयत्न फसला ; पालकांमध्ये पसरली भीती

उत्राण येथील घटना एका महिलेसह दोघे गाडीवरून झाले पसार

editor desk by editor desk
September 23, 2022
in क्राईम, जळगाव
0
विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्याचा तिघांचा प्रयत्न फसला ; पालकांमध्ये पसरली भीती

उत्राण : प्रतिनिधी

येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला दोघांसह एका महिलेने बळजबरीने बुंदीच्या लाडूत गोळी देवून गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने हे तिघे गाडीवर बसून पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उत्राण येथे घडली.

उत्राण येथील संजय (दिनकर) प्रभाकर महाजन यांची कन्या प्रांजली महाजन ही एस. बी. संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीचे शिक्षण घेत आहे. प्रांजली ही २२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास स्कूल बसची वाट पाहत उभी होती. या वेळी प्रांजलीजवळ दोन अज्ञात व्यक्तींसह गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली एक महिला आली. या महिलेने नाकात दोन्ही बाजुला नथ घातलेली होती, तर तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचे पांढऱ्या रंगाचे कपडे होते. या वेळी महिला व त्या दोघांपैकी एकाने प्रांजलीला बळजबरीने बुंदीचा लाडू देवून तो खाण्यासाठी जोर दिला. त्यामुळे घाबरलेल्या प्रांजलीने तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या महिलांना आवाज दिला. हे पाहून त्या महिलेसह ते दोघे पुरुष गाडीवर बसून पसार झाले. दरम्यान, ही माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य हरेश पांडे, पोलिस पाटील राजेंद्र महाजन यांनी या घटनेबाबत तत्काळ कासोदा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल नितीन मनोरे यांनी घटनास्थळी भेट देवून लाडू तपासणीसाठी त्यांनी ताब्यात घेतला. यामुळे पालक धास्तावले आहेत.

लाडूत आढळली गोळी
प्रांजली हिने तो लाडू महिलांना दाखवला. महिलांनी हा फोडून पाहिला असता, त्यात एक गोळी आढळली. ही घटना समजताच ग्रामस्थांनी या तिघांचा शोध सुरु केला. परंतु, ते सापडले नाहीत.

Previous Post

मोहाडी फाट्याजवळील हॉटेलमध्ये तरुणास मारहाण

Next Post

बातमी विद्यार्थासाठी : अकरावीसाठी शेवटची संधी : उद्या गुणवत्ता यादी

Next Post
बातमी विद्यार्थासाठी : अकरावीसाठी शेवटची संधी : उद्या गुणवत्ता यादी

बातमी विद्यार्थासाठी : अकरावीसाठी शेवटची संधी : उद्या गुणवत्ता यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group