• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

केसीईच्या आयएमआर महाविद्यालयाला एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट म्हणून मान्यता

आयएमआरच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांची माहिती

editor desk by editor desk
September 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
केसीईच्या आयएमआर महाविद्यालयाला एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट म्हणून मान्यता

जळगाव : प्रतिनिधी

के.सी. ई. सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव ही खान्देशातील पहिली एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट संस्था म्हणून मान्यता प्राप्त केली आहे. आपल्या संस्थेकडून के.सी.ई.च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त मिळवलेली ही विशेष उपलब्धी आहे. या महत्वपूर्ण यशामागे संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची दुरदृष्टी आणि मार्गदर्शन असल्याचे आय. एम. आर. च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी नमूद केले.

नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन हे बोर्ड ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांच्या अंतर्गत काम करते. उच्च व तंत्र शिक्षणात उच्च गुणवत्ता आणि दर्जा याचा मापदंड म्हणून या अॅक्रिडेशनला अत्यंत महत्व आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बेस्ट प्रॅक्टीसेस आपल्या संस्थेत आहेत की नाही हे येणारी कमिटी चेक करते. आय. एम. आर. ला भेट दिलेल्या कमिटीत हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुनिल कुमार गुप्ता, प्रा. डॉ. दिपक टंडन, आय. आय. एम. दिल्ली हे शिक्षण तज्ञ होते.

या मान्यतेमुळे आता महाराष्ट्रातील टॉप मॅनेजमेंट संस्थांच्या रांगेत के.सी.ई.आय.एम.आर. ने आपले स्थान निर्माण केले आहे. तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी हे औद्योगिक जगतात लागणारे कौशल्यप्राप्त आहेत. ह्याची पडताळणी करणारी ही एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा नियंत्रित केली जाते ती जनरल कॉन्सिल आणि एक्झीक्युटीव्ह कमीटी मार्फत आउटकम बेस शिक्षणप्रणाली तपासण्यासाठी वॉशिग्टन या जागतिक पातळीवरील शिक्षण प्रणालीचे मापके वापरली जातात. अशा प्रकारच्या कठीण तपासणी यंत्रणेला सामोरे जावून अॅक्रिडेशन मिळवणारी के.सी.ई.चे आय.एम. आर. ही खान्देशातील पहिली व्यवस्थापन संस्था आहे.

संस्थेच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून के.सी.ई.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आय. एम. आर. च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या अॅकेडेमिक डीन डॉ. तनुजा फेगडे, एन. बी. ए. कोऑर्डनेटर डॉ. पराग नारखेडे आणि आय. एम. आर. येथील प्राध्यापकांच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निकाल लांबणीवर ; कधी होणार सुनावणी?

Next Post

कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बापासह तिघे ताब्यात

Next Post
चोपड्यात शासकीय डॉक्टरांना धक्काबुक्की ; पोलिसात गुन्हा दाखल

कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बापासह तिघे ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group