Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निकाल लांबणीवर ; कधी होणार सुनावणी?
    राजकारण

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा निकाल लांबणीवर ; कधी होणार सुनावणी?

    editor deskBy editor deskSeptember 22, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही, याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

    महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता उद्या सुनावणी होणार आहे. मुळे यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कच्या मैदानावर आवाज कुणाचा असणार? आणि यासंदर्भात हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.आज झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. तर शिवसेनातर्फे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी युक्तिवाद केला. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठ्ये यांची बाजू मांडली.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वकिलाने आपल्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मागितल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याच्या याचिकेवरील सुनावणी आज दुपारी अडीच वाजेपर्यंत पुढे ढकलली असल्याची प्रथम माहिती समोर आली होती.

    दरम्यान, आता शिवसेनेच्या या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. दसरा मेळावा परवानगीबाबत उद्या दुपारी १२ नंतर सुनावणी होणार आहे. वकिलांच्या विनंतीवरुन आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. वसेनेच्या वकिलांच्या विनंतीवरुन आजची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने आम्ही दाखल केलेल्या अर्जावर उत्तर दिलं आहे. आम्ही जेव्हा याचिका दाखल केली तोपर्यंत उत्तर दाखल झालं नव्हतं. कायदा आणि सुव्यवस्थाच्या कारणाखाली आमची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या याचिकेत सुधारणा करण्याती परवानगी देण्यात यावी. बदल करुन आम्ही नव्या मुद्यावरुन याचिकेत सुधारणा करत कोर्टापुढे येऊ शकतो. असे शिवसेनेच्या वकिवांनी युक्तिवाद केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.