अमळनेर : प्रतिनिधी
शिक्षणाचा बाजार मांडला आहे की काय असे काही दृश्य बघून वाटत असते, हो तसे खरच होताना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय आवारात दि २१ रोजी घडला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात दुचाकीची जाहिरातचा मंडप टाकून महाविद्यालय प्रशासन आपली तिजोरी भरतेय की काय असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने येथे उपस्थित केला आहे.
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात बहुताश तालुक्यातील शेतकरी व कामगार व मजुरांचे मुल शिक्षण घेत असतात. या महाविद्यालयात शिक्षणाच्या जागी येणाऱ्या प्राध्यापक व विध्यार्थाच्या दुचाकी व सायकल लावण्यासाठी प्रशासनाकडून पैसे घेतले जात आहे तर मग विद्यार्थी फी भरतात कशाची? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तर तालुक्यातील शेतकरी व कामगार वर्ग याठिकाणी आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवत असतात, त्या आई वडिलाची परिस्थिती नसली तर ते पैश्यासाठी राब राब काम करतात व महाविद्यालाची फी भरतात, त्यामध्ये जर महाविध्यालय प्रशासन जर अशा दुचाकी कंपनीच्या मालकांकडून जागेचे भाडे घेवून विद्यार्थीना गाडी घेण्याकरिता उस्ताह वाढवीत आहे. विद्याथ्री आपल्या पालकांकडे गाडीचा अट्टाहास करून लाखो रुपयाची दुचाकी विकत घेण्यास भाग पाडत आहे. त्या विषयाचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येवून लवकरच महाविद्यालय प्रशासना विरोधात मोर्चा काढून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा इशारा भुषण संजय भदाणे यांनी दिला आहे.