पुणे : वृत्तसंस्था
एका शेतकऱ्याला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी सापडते. तिच्याकडून मिळणारी अंडी घेऊन तो शेतकरी मालामाल होतो. ही गोष्ट आपण सर्वांना तोंडपाठ असेल. ही काल्पनिक गोष्ट खरी झाली आहे. या गोष्टीप्रमाणे एक शेतकरी १० पैशाच्या माशांमुळे करोडपती बनला आहे.
निहाल सिंग असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात. ते राजस्थानमधील कामा तालुक्यातील उंधन या गावी राहतात. वयाच्या ३५ व्या वर्षापासून ते मत्स्यपालन व्यवसाय करत आहेत. या 20 वर्षांत त्यांनी यातून करोडपती झाले आहेत.निहाल सिंग हे शेतकरी कुटुंबातील असून ते लहानपणापासून शेती करतात. मला दोन भाऊ असून आमच्या जेव्हा मालमत्तेच्या वाटण्या झाल्या तेव्हा तेव्हा 5 एकर जमीन मला मिळाली. केवळ जमीन मिळाल्याने आणि कुटुंब मोठे असल्याने आर्थिक चणचण भासत होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावण्यासाठी म्हणून शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. असे, निहाल सिंग यांनी सांगितले.
ही गोष्ट मित्रांना सांगितल्यावर त्यांनी मला त्या जमिनीवर शेततळे बांधून मत्स्यपालन करणायचा सल्ला दिला. त्यावेळी मी व्यवसाय सुरू केला. पण, जागा अपुरी पडत असल्याने मी काही काळासाठी गावचा तलाव भाडेतत्वावर घेतला होतो. यातून मी पहिल्या प्रयत्नात 6 लाख रुपये कमावले होते,असेही निहाल सिंग म्हणाले.पुढे ते म्हणाले की, या व्यवसायासाठी मी सर्वप्रथम १० पैसे किमतीचे छोटे मासे घेतो. त्या माशांना तलावात टाकून त्या माशांचे पालन करतो. ते मासे मोठे झाल्यावर व्यापाऱ्यांना विकतो. माशांचे वजन आणि मागणीनुसार त्यांची किंमत केली जाते.
या मत्स्यशेतीतून मी आज करोडो रुपये कमावले आहेत. यामुळेच मी माझ्या तीन मुलींची लग्न थाटामाटात करू शकलो.माझा मोठा मुलगा फरीदाबादमध्ये नोकरी करतो तर धाकटा मुलगा अजूनही शिक्षण घेत आहे. या पैशातून मी 7 एकर जमीन खरेदी केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या 12 एकर जमीनीची किंमत कोटींच्या घरात आहे. निहाल सिंग त्यांचे मासे, दिल्ली आणि फरिदाबादच्या फिश मार्केटमध्ये विकतात. त्यांच्या गावार पाण्याची समस्या असल्याने निहालसिंग यांनी तलावात पाणी भरण्यासाठी बोअरिंग मारले आहे. तसेच मासे चोरीला जाण्याची भीती असल्याने दोन सुरक्षारक्षकही ठेवण्यात आले आहेत.