जळगाव : प्रतिनिधी
घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या मंडळींनी जळगावातील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत विवाहितेने फिर्याद दिल्यावरून पती, सासू-सासरे आणि दिराविरूढ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हिराशिवा कॉलनीतील माहेर असलेले नेहा परेश सोनवणे (वय २२) हिचा विवाह पुणे येथील परेश मनोहर सोनवणे यांच्याशी २०२१ मध्ये झाला होता. काही दिवसानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रुपयांची सासरच्या मंडळीकडून मागणी सुरु झाली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करण्यात आली. पैशांसाठी सासरे, सासू, दीर यांनी पैशांसाठी तगादा लावला. हा त्रास असाह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १९ सप्टेंबर रोजी पती परेश मनोहर सोनवणे, सासरे मनोहर आत्माराम सोनवणे, सासून शर्मीला मनोहर सोनवणे आणि दीर यश मनोहर सोनवणे (सर्व रा. पुणे) यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी हे करीत आहे.