धरणगाव प्रतिनिधी(अमोल पाटील): शासनाने शेतकऱ्यांसाठी मीच नोंदविणार माझा पीक पेरा असे अँप सुरू केले या अँप वर शेतकऱ्यांना आपला स्वतः चा पेरा नेदविता यावा यासाठी धरणगांव तालुक्यातील दोनगांव खु येथील तलाठी व पोलीस पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.
धरणगांव तालुक्यातील दोनगांव खु येथे माझी शेती माझा सातबारा ,मीच नोंदविणार माझा पीक पेरा या धर्तीवर राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या स्वतः चा पीक पेरा मोबाईल द्वारे लावता यावा यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, प्रांतधिकारी विनयजी गोसावी,तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुक्यातील प्रत्येक गावात ई पिकपेरा प्रशिक्षण घेण्यात येत आहे
दोनगांव खु येथे देखील याच पद्धतीने प्रत्यक्ष शेतात जाऊन दोनगांव खु पोलीस पाटील भरत बाविस्कर सजा चे तलाठी राहुल डेरंगे यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते याप्रसंगी कोतवाल ज्ञानेश्वर माळी, तसेच गावातील शेतकरी संदीप भाऊलाल पाटील ,अनिल पाटील ,वासुदेव बापू पाटील,दत्तू पाटील आदी उपस्थित होते.