मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणसंदर्भात ही महत्वाची बातमी आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यात भाजप नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या उपसमितीमद्धे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभुराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समितीचे अध्यक्ष पद चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे. यापुढे मराठा आरक्षणबद्दल बैठका होतील किंवा शिष्टमंडळे येतील जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते ही समिती घेईल यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. आगामी काळातील मराठा आरक्षण बद्दलचा तिढा, मराठा समाजाच्या सोई सुविधा किंवा आर्थिक बाबी आहे त्या सोडवण्यासाठी या समितीची निर्मिती करण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या काळात या उपसमितीचे अध्यक्ष हे अशोक चव्हाण होते. तर एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे सदस्य होते.