Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आई-वडिलांच्या डोळ्या देखत ८ वर्षांचा मुलाचा मृत्यू
    क्राईम

    आई-वडिलांच्या डोळ्या देखत ८ वर्षांचा मुलाचा मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 20, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलडाणा : वृत्तसंस्था

    बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरामध्ये मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ८ वर्षीय चिमुकला जागीच ठार झाला तर आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमी आई-वडिलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

    बुलडाण्यातील नांदुराजवळ हा अपघात घडला आहे. आयुष डाबेराव (वय ८ वर्ष) असं मृत मुलाचं नाव आहे. आयुष हा आपल्या आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता. डाबेराव दाम्पत्य आपल्या दुचाकीने नांदुराकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकची धडक बसल्यामुळे दुचाकीवरून तिघेही फेकले गेले. त्यामध्ये 8 वर्षीय आयुष डाबेराव हा चिमुकला जागीच ठार झाला तर त्याचे आई वडील गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी खामगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोघांवर उपचार सुरू आहे. 8 वर्षांच्या आयुषचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात घडला. भरधाव क्रेटा कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकली . हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळावरील काही फोटो समोर आले असून या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळतं. या घटनेत चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून तिघांचा मृत्यू झाला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.