जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या ५ ते ६ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. बहुताश ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून राज्य शासनाच्या वतीने हवालदिल झालेल्या शेतकरीना मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ ते ६ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे व अजून पुढील काही दिवस हा पाऊस सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. बहुताश ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून राज्य शासनाच्या वतीने हवालदिल झालेल्या शेतकरीना मदत मिळावी, यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,सोपान पाटील, अरविंद मानकरी, विशाल देशमुख, राजू मोरे, संजय पवार यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.