जळगांव प्रतिनिधी : शहरासह गावांना पुराने वेढले आहे यामुळे नागरिकांना उघड्यावर किंवा मंगल कार्यालयात आश्रय घ्यावा लागला आहे घरात पाण्यात शिरल्या ने खाण्यासाठी काहीच नसल्याने या नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन धावून आले असून त्यांच्यासाठीअन्नाच्या पाकीट व पाण्याचे बाटल्या चाळीसगावला रवाना केल्या आहेत.
चाळीसगाव येथे तीतुर नदीला आलेल्या महापूर मुळे बरेच लोक पुराचे संकटात अडकले असलेने पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे ,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी ,उपविभागीय पोलीस अधिक्षक कुमार चिंता सो यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे आलेले पुरामुळे निर्माण झालेले संकटात मदत करने साठी सूचना दिल्या होत्या त्या नुसार पोलीस निरिक्षक जिल्हापेठ,पो नी जळगाव शहर ,पो नि MIDC,पो नि रामानंद नगर पोलीस स्टेशन यांनी मिळून जळगाव शहरातील दाते लोकांकडून खालीलप्रमाणे मदत गोळा केली पाणी बॉटल बॉक्स – 100 बिस्कीटबॉक्स – 40 (4500 बिस्कीट पुढे ब्लण्केट -150 चटई – 500 फूड पेकेट – 500 असे एकूण 5 टन मोठी पोलीस वाहनात भरून उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंता यांनी जिह्यापेठ येथे झेण्डा दाखवून रवाना केले आहे.