मुंबई : वृत्तसंस्था
जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम नोकरीचा पर्याय आहे. देशातील महारत्न कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ने अभियंता पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार BHEL च्या अधिकृत वेबसाइट bhel.com ला भेट देऊ शकतात. या भरतीद्वारे एकूण १५० पदे भरली जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे.
रिक्त जागांचा तपशील
स्थापत्य अभियांत्रिकी – ४० पदे
यांत्रिक अभियांत्रिकी – ३० पदे
आयटी/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी – २० पदे
इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी – १५ पदे
केमिकल इंजिनिअरिंग – १० पदे
धातूशास्त्र अभियांत्रिकी – ५ पदे
वित्त – २० पदे
HR – १० पदे
वय मर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २७ वर्षांवरून २९ वर्षे करण्यात आली आहे.
पगार
रु. ६० हजार – १ लाख ८० हजार
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणार्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. वेबसाइटला भेट देऊन शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवावी.
निवड प्रक्रिया
BHEL मध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना संगणक आधारित चाचणी द्यावी लागेल. अभियंता आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार CBT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर निवडले जातील.
अर्ज शुल्क
अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये आणि प्रक्रिया शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागतील. एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.