जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरीचे रॅकेट उघड करत पाच दिवसात २६ दुचाकी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तुळशीराम कोळी (वय १९ रा. चौगांव ता. चोपडा जि.जळगाव) याच्याकडून १५ तर पवन प्रेमचंद पाटील (वय २६ रा. आव्हाणी ता.धरणगाव) याच्याकडून ११ अशा एकून २६ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
जळगाव शहर पोलीस स्थाकानाच्या हद्दीत मोठी बाजार पेठ असल्याने जिल्हयातील नागरीकांची खरेदीसाठी खुप गर्दी होत असते. याचाच फायदा घेवुन काही चोरटयांनी नागरीकांच्या दुचाकी चोरण्याचा धडाका लावला होता. विशेषता शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचे प्रमाण खुप वाढले होते. त्यावरुन जळगांव शहर पो.स्टेला मो.सा. चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.दुचाकी चोरीचे प्रकार वाढल्यामुळे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,पोलीस उपअधिक्षक कुमार चिंता यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी आपल्या डी. बी. पथकास सूचना केल्या. या पथक हे गेल्या दोन-तीन महिन्यानपासून आरोपीच्या मागावर होते.
दि.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी एल आरोपी दुचाकी चोरीसाठी आल्याची गुप्त माहिती डीबीच्या पथकातील पोना/ किशोर निकुंभ, पोना / गजानन बडगुजर, पोकों/तेजस मराठे, योगेश इधाटे यांना मिळाली होती. यामुळे पुर्वीच सापळा लावून बसलेल्या पथक अधिकच सर्तक झाले आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपी दाणा बाजार परीसरात येताच पो.उपनिरी दत्तात्रय पोटे, पोहेकॉ / उमेश भांडारकर पोनर / किशोर निकुंभ पोना / गजानन चडगुजर, पोना/ योगेश पाटील, पोना/ राजकुमार चापोस्तन गिते, पोवा/तेजस मराठे, पोव/योगेश इंगाटे यांनी आरोपीतास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव तुळशीराम कोळी सांगत दुचाकी चोरींची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून आतापर्यंत १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर तुळशीरामने आपला एक साथीदार फरार असून त्याने देखील ब-याच दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलीस चौकशीत दिली. त्यानुसार पवन प्रेमचंद पाटील ( वय २६ रा. आव्हाणी ता.धरणगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. मागील पाच दिवसात जळगाव शहर पोलीस डी.बी.पथकाने एकुण २६ दुचाकी जप्त केल्या आहे.