भडगाव : प्रतिनिधी
शहरातील माहेर असलेले व जळगावातील सासर असलेले एका २४ वर्षीय विवाहितेला माहेरून 12 लाख रुपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, भडगाव येथील माहेर असलेले रुपाली शुभम नेरकर (वय २४) हिचे सासर जळगाव येथील महावीर नगरातील आहे. रुपाली हिचा पती शुभम अनंत नेरकर याला नोकरी लावण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणावे ,यासाठी रुपाली हिची सासू सरिता अनंत नेरकर व पती शुभम अंनत नेरकर या दोघांनी गेल्या ८ महिन्यापासून पैशाचा तगादा लावत शिवीगाळ व मारहाण करीत होते. तसेच शारीरिक व मानसिक छळ सुरु होता. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंचक्षीला निकम हे करीत आहेत.