भडगाव : प्रतिनिधी
शहरातील ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागातील ३० वर्षीय विवाहितेला योगेश शिवाजी महाजन याने त्याच्या दुकानात बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला होता. एवढेच नाही तर या अत्याचाराचे व्हिडीओ चित्रीकरण त्याने मोबाईलमध्ये केले होते. यानंतर व्हिडीओ तुझा पती, आईवडील व भाऊला पाठवून देण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून विवाहितेवर वारंवार अत्याचार केले. तसेच विवाहितेचा अश्लिल शिवीगाळ करून धमकी देत होता. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश शिवाजी महाजन याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.