धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तरडे येथील रहिवासी राजेंद्र पाटील यांचे चिरंजीव गोपाल पाटील यांची नुकतीच इंग्लड येथे मास्टर ईन ईन्टरनॅशनल बिझनेस शिक्षणासाठी निवड झाल्याबदल त्यांचे जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून कौतुक केले.
महाविर काॅटनचे संचालक राजेंद्र पाटील यांचे चिरंजीव गोपाल पाटील यांची मास्टर ईन ईन्टरनॅशनल बिझनेस या शिक्षणासाठी यु.के.(ईग्लंड) या ठिकाणी जात असुन त्यांना जिल्ह्याचे मा.पालकमंत्री तथा चेअरमन जिल्हा बॅंकचे गुलाबराव देवकर यांनी सदिच्छा भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ह.भ.प.केशव पाटील, माजी जि.प.सदस्य रवी पाटील, श्याम पाटील यासोबत गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.