जामनेर : प्रतिनिधी
मोबाईलवर पाठवलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच एकाला ३९ हजाराचा फटका बसला आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शेख सुफीयाना शेख कलीम (वय २८, रा.जामनेर पुरा) यांच्या मोबाईलवर १३सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ७३८१७०८२०७ या मोबाईलवरून एक एसएमएस आला. एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या क्रेडीट कार्डमधून ३९ हजार रुपये कपात झालेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख सुफीयाना यांनी ७३८१७०८२०७ या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.