जळगाव : प्रतिनिधी
शहरातील निमखेडी शिवारातील एका अपार्तमेंट मधील घरातून चोरट्यांनी तब्बल दीड लाख रुपयांची सोने चांदीच्या दागिने घेवून पोबारा केल्याची घटना दि १४ रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील निमखेडी शिवारातील हिरा गौरी पार्क येथील के.हाईट अप्पार्त्मेंत मधील ६ नंबर घर बंद पाहून चोरट्यांनी घराचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरामधील बेडरूममधील कपाटातून ८१ हजार किमतीची ४५ ग्राम वजनाची मंगलपोत, ३६ हजाराची सोन्याची चैन, ५,४०० रुपयांचे सोन्याचे कानातील टोप्स, १२ हजार ६०० रुपये किमतीचे ७ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टोगल, ९ हजार रुपये किमतीचे ५ ग्राम सोन्याची अंगठी, असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दि १३ रोजी रात्री पासून ते १४ रोजीच्या सकाळपर्यंत ही घडली आहे. याप्रकरणी गोविंदा हिलाल पाटील (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अद्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.