जळगाव-प्रतिनिधी । एमआयडीसी हद्दीलत हॉटेल कस्तूरीजवळ एका खड्ड्यात गायीचा पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. प्रशासनाच्या कारभारामुळे अनेकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे.
जळगाव शहरातील खड्डे हे सर्वश्रृत आहे. जळगाव शहरातील एकही रस्ता असा नाही तो चांगला असेल. शहरातील रस्ते तयार व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू अद्यापही शहरातील गल्लीतील रस्ते तर सोडाच मुख्य रस्ते देखील होण्यास तयार नाही. शासकीय कामांचे नावे सांगून आहे ते रस्त्यांमध्ये खड्डे केले जात आहे. असे असतांनाच एमआयडीसी हद्दीतील हॉटेल कस्तूरी जवळ पाण्याच्या पाईप लाईनच्या दुरूस्तीसाठी केलेल्या खड्ड्यात एका गायीचा पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे गायीला बाहेर येता न आल्याने तिचा मृत्यू झालाय. दरम्यान, शहरातील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्डे प्रशासनाने तातडीने बुजावेत अशी मागणी नागरीकांसह वाहनधारकांकडून केली जात आहे.