पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील निपाणे येथे दिनांक १३ च्या रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे.आईचं प्रेत घेऊन तो गावाच्या सार्वजनिक स्मशानभूमीत पोहचला खरा पण जातीचे कारण देत या स्मशानभूमीत प्रेत जाळू नये म्हणून काही राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी थेट विरोध केला. मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा अंत्यसंस्कार करण्यासाठी विनवणी करीत होता पण कुणीच ऐकून घेतले नाही अखेर स्मशान भूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी आज दिनांक १५ रोजी पाचोरा पोलिसात ११ जणांविरुद्ध अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर गिरधर पाटील, रोशन धनराज पाटील, राजेद्र विश्राम पाटील, त्रिंबक हिलाल पाटील, मयुर राजेंद्र पाटील, गोकुळ सुरेश पाटील, निलेश नथ्थु पाटील, शांताराम राजधर पाटील, भैय्या बाळु पाटील ज्ञानेश्वर पाटील, वैभव राजेंद्र पाटील सर्व राहणार निपाणे ता.पाचोरा,जि जळगाव,
याप्रकरणी निधन पावलेल्या महिलेच्या मुलगा समाधान वामन धनुर्धर यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटलं आहे की,माझी आई निलाबाई वामन धनुर्धर ही माझी बहीण सोनल मुकेश शिरसाठ यांचे कडेस भेटण्यासाठी सुरत येथे गेलेली होती.दि.11/09/2022 रोजी रात्री 10:30 वा. चे सुमारास आई निलाबाई वामन धर्नेधर ही सुरत येथे बहीणीकडेस असतांना वृध्दपकाळातील आजाराने निधन झाल्याने मी पाचोरा येथुन अँब्युलन्स बोलावुन तेथुन, सुरत येथे जावुन आईस प्रेत दि. 12/09/2022 रोजी आमचे गांवी निपाणे ता. पाचोरा येथे घेवुन आलो होतो. आईचे प्रेतावर अतविधी करणेसाठी रात्री 10:30 वा. चे वेळ दिली होती. गांवात पाऊस चालु असल्याने प्रेताचे व्यवस्थीत दहन व्हावे यासाठी गांवातील जिल्हा परीषदने बांधलेल्या स्मशानभुमीत अनेकदा प्रेतावर अंत्यसंस्कार केले जातात. सदरची स्मशानभुमी कुणासाठीही राखीव नाहीये. आम्ही आमचे आईवर सदरच्या जिल्हा परीषेदने बांधलेल्या नविन स्मशानभुमीत अतसस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी आमचे गांवात रात्री खुप मोठया प्रमाणात पाऊस येत होता. आम्ही सर्व समाजाने निर्णय घेतल्याप्रमाणे पावसात आईचे अंतसस्कार व्यवस्थीत होणार नाही म्हणुन सदर नविन स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्याचे निश्चीत केले त्याप्रमाणे माझे आईची अंतयात्रा रात्री 11:30 वा. स्मशान भुमीत गेलो असता अंगीडाग देणेसाठी बांधलेल्या ओटयावर प्रेत ठेवुन लाकडे रचत असतांना तेथे आमचे गावातील मनोहर गिरीधर पाटील, रोशन धनराज पाटील, राजेंद्र विश्राम पाटील, त्रंबक हिलाल पाटील, भैया वालु पाटील सर्व • रा. निपाणे ता.पाचोरा यांनी माझे आईचे अंतसस्कार स्मशानभुमीत करण्यास विरोध केला यापैकी रोशन धनराज पाटील हा आम्हाला बोलला की, ही स्मशानभुमी महारांची नसुन मराठयांची आहे. येथे तुमचे महारांचे प्रेते जाळता येणार नाही. त्यावर मनोहर गिरीधर पाटील याने मला व माझे समाजाला ही स्मशानभुमी जिल्हा परीषदने मराठा समाजासाठी बांधलेली आहे तुम्ही महार समाजाने नेहमी प्रमाणे गांव कुशाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत तुमच्या आईला जाळा इकडे आम्ही प्रेत जाळु देणार नाही विनाकारण वाद घालुन मार खाण्याचे काम करु नका मनोहर गिरीधर पाटील असे बोलत असतांना त्यांचे सोबत आलेले राजेंद्र विश्राम पाटील, त्रंबक हिलाल पाटील, रोशन धनराज पाटील, मयुर राजेंद्र पाटील, गोकुळ सुरेश पाटील, निलेश नथ्थु पाटील, शांताराम राजधर पाटील सर्व रा. निपाणे ता. पाचोरा यांनी येवुन सांगीतले की, तुम्ही आमचे मराठा समाजाचे स्मशान भुमीतुन महाराचे प्रेत उचलुन • घेवुन जा नाही तर तुम्हाला या मुर्दासोबत तुमचेही मुर्द पाडु अशी धमकी दिली तुम्ही महार मस्ती आले आहेत अशी जातीवाचक शिवीगाळ करुन आपल्या मराठयांचा स्मशानभुमीतुन या महाराचे प्रेत उचला आणि गावाबाहेर फेकुन या आपल्या मराठयांची ही स्मशानभुमीत सकाळी गोमुत्राने धुवून काढा हे म्हारटे इतके मस्ती आलेत की, आता आपल्या स्मशानभुमीत प्रेत जाळण्यास घेवुन आले आता आपल्या स्मशानभुमीत प्रेत जाळण्यास घेवून आले उदया आपल्या घरातपण हक्क सांगतील यांची मस्ती आजच जिरवा असे मला व माझे सोबत असलेले माझे नातेवाईक सुरेश गणपत धर्नेधर, शंकर श्रावण सोनवणे, डिंगबर शंकर धनुर्धर, सुभाष लक्ष्मण भालेराव, चंद्रभान मोतीराम धनुर्धर, विशाल रतन पगारे, विशाल एकनाथ बाविस्कर, संतोष निंबा खैरे व इतर सर्व रा. निपाणे ता. पाचोरा यांनी गांवातील मनोहर गिरीधर पाटील, रोशन धनराज पाटील, वालीया भैया बालु पाटील यांना समजावुन सांगण्याचा खुप प्रयत्न केल्या विनंती केली परंतु त्यांनी आमचे काहीएक ऐकले नाही व आम्हाला धक्काबुक्की करुन आमचे अंगावर धावून यायला लागले म्हणुन मी व आमचे समाजातील लोकांनी मिळुन आमचे आईचे अंत्यसंस्कार स्मशानभुमीचे बाहेर मोकळया जागेत लाकडे व टायर पेट्रोल व डिझेलच्या सहयाने रात्री सुमारे 12:30 वा. चे सुमारास अंतविधी पार पाडला आहे. माझे आईचे धार्मिक विधी करुन आज रोजी फिर्याद देण्यास आलो आहे. तरी दि.12/09/2022 रोजी रात्री 11:30 वा. ते 12:30 वा. चे दरम्यान निपाणेा ता.पाचोरा गांवातील जि.प. निधीतुन बांधलेल्या स्मशानभुमीचे आवारात यातील इसम नामे 1) मनोहर गिरीधर पाटील, 2) रोशन धनराज पाटील, 3)राजेंद्र विश्राम पाटील 4) त्रंबक हिलाल पाटील 5) मयुर राजेंद्र पाटील 6 ) गोकुळ सुरेश पाटील 7) निलेश नथ्थु पाटील 8) शांताराम राजधर पाटील 9) भैया बालू पाटील, 10) अजाबराव ज्ञानेश्वर पाटील 11) वैभव राजेंद्र पाटील सर्व रा. निपाणे ता.पाचोरा जि. जळगांव असे स्मशानभुमीत जमुन माझी आई निलाबाई वामन धनुर्धर हीचे प्रेत अंतविधीसाठी जि.प.स्मशानभुमीत घेवुन गेले असता तीचे प्रेतावर स्मशानभुमीत अंतविधीस विरोध करून तीचे प्रेताची अवहेलना करुन अंतविधी करण्यास विरोध करुन मला व माझे नातेवाईकांना बोलले की, आमचे मराठा समाजाचे स्मशान भुमीतुन महाराचे प्रेत उचलुन घेवुन जा नाही तर तुम्हाला या मुर्दासोबत तुमचेही मुर्द पाडु अशी धमकी दिली व तुम्ही महार लोक मस्ती आले आहेत अशी जातीवाचक शिवीगाळ करुन आपल्या मराठ्यांचा स्मशानभूमीतून या महाराचे प्रेत आपले स्मशानभुमीतुन फेकुन दया अशी धमकी दिली म्हणुन’माझी वरील लोकांन विरुध्द फिर्याद आहे.
या कलमान्वय गुन्हा दाखल…
या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता १८६० च्या १४३,१४७,२९७,३२३,५०४,५०६ व अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ 3(1) (r),अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती 3(1) (s),(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९३(१) (५), अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती 3(1)(z),अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९3(2) (va) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.