• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ.मंगेश चव्हाण आक्रमक : पीआय किरणकुमार बकाले यांना निलंबित करा

editor desk by editor desk
September 14, 2022
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव, राजकारण, राज्य
0
आ.मंगेश चव्हाण आक्रमक : पीआय किरणकुमार बकाले यांना निलंबित करा

जळगाव : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटले आहे की, फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप मला काल संध्याकाळी प्राप्त झाली होती. एका पोलीस अधिकाऱ्याची एखाद्या समाजाविषयीची भावना व वापरलेली भाषा पाहता अशा जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्यात येऊन त्याची चौकशी करावी अशी मागणी मी कालंच संध्याकाळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे फोनवरून केली होती. मात्र मला प्राप्त माहितीनुसार सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले याला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आली आहे.
सदर ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात राहणे म्हणजे जातीयवादाला खतपाणी घालणे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही दोन समाजात सामंजस्य राखणे माझी जबाबदारी आहे. सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ठेवावी. व सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तात्काळ निलंबन बाबत कारवाई करावे. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिक्षक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

Previous Post

विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या जिल्ह्यात

Next Post

मृत्युंजयी लताबाई बाविस्कर यांचा देवकरांकडून सत्कार

Next Post

मृत्युंजयी लताबाई बाविस्कर यांचा देवकरांकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group