पाचोरा : प्रतिनिधी
एका नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी या बापाला अटक केली आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केले आहे. तक्रारीनुसार नराधम बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती. परंतू मागील काही दिवसांपासून प्रकार वाढल्यामुळे पिडीत मुलीने शेवटी आईला सर्व घटना सांगितली. आईने आपल्या भावांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर मंगळवारी रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.