Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उमेदवारीच्या नावाखाली महिलेवर बलात्कार ; मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
    क्राईम

    उमेदवारीच्या नावाखाली महिलेवर बलात्कार ; मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskSeptember 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबईच्या मनसे विभाग प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या एका 33 वर्षीय विभाग अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
    आरोपीने 42 वर्षीय महिलेला येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचे आमिष दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. तसेच, सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 दरम्यान विविध आमिष दाखवून विविध ठिकाणी शारिरीक संबध ठेवत फसवणूक केल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

    या तक्रारीनंतर पोलिसांनी वृशांत वडके यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376, 500 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसेच्या वरिष्ठांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली होती. चार दिवसांपूर्वीच पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता. आरोपी हा गिरगावमध्येच वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. मनसे पदाधिकाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात विविध उपक्रमात, तसेच वेळोवेळी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात केलेल्या कार्याची दखल घेत मनसेच्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्षपदी वृशांत वडके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.