जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नेहरू चौकातून एका ६५ वर्षीय वृद्धाची दुचाकी अद्यात व्यक्तींनी लांबविल्या प्रकरणी शहर पोलिसात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी सागरमल पन्नालाल सोमाणी (वय ६५) हे कामानिमित दि ६ रोजी नेहरू चौकात दुचाकी पार्किंग करून आपल्या कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी कुणी तरी अद्यात व्यक्तीने त्यांची होंडा कंपनीची दुचाकी क्र.एम.एच.१९ सी.के.७११९ हि चोरून नेली याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात धाव घेत दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास योगेश बोरसे करीत आहेत.