यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावर एका २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि १२ रोजी ३ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. संशयित आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया (वय २८, रा.) बेह्राम्पुरातील जि.खरगोन मध्यप्रदेशयेथील रहिवासी आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.