लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वपक्षीय पॅनल साठी अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला असून पाच वर्षात 4 चेअरमन व चार व्हाईस चेअरमन असणार आहे.
अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते भाजपनेते गिरीश महाजन हे सर्वपक्षीय बैठकीला उशिरा पोहोचल्याने तर्क वितर्क लढवले जात होते. परंतु बैठकीच्या शेवटच्या अर्धा तास अगोदर पोहोचल्याने तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.जिल्हा बँक चेअरमन पदाचे कसे राहील असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पाच वर्षात सव्वा सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला. तसेच या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजपा नेते गिरीश महाजन हे शेजारी शेजारी बसलेले असले तरी त्यांनी एकमेकांकडे पाहिले नाही चर्चा केवळ समोर बसलेल्या पदाधिकाऱ्यां शी ते करत होते .या बैठकीत राजकीय कोपरखळ्या तेथील मारल्या गेल्या.शेवटी ऐन वेळेस काय निर्णय होतो.याकडे लक्ष लागून असून तूर्त तरी सर्वच पक्ष पॅनल ला हिरवा झेंडा दिला गेला आहे.