नशिराबाद : प्रतिनिधी
एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी संबध ठेवत ७ महिन्याची गरोदर केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात एका विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका १७ वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवीत वेळोवेळी संबध प्रस्थापित करत तिला सात महिन्याची गर्भवती केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडित युवतीच्या वडिलांनी दि १२ रोजी नशिराबाद पोलीस स्थानकात धाव घेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील रहिवासी विशाल तानाजी पवार याच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.