• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अबब… मुंबईत विमानतळावरून ५ कोटीपेक्षा जास्त किमतीचे सोने सापडले

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई

editor desk by editor desk
September 11, 2022
in क्राईम, राजकारण, राज्य
0
अबब… मुंबईत विमानतळावरून ५ कोटीपेक्षा जास्त किमतीचे सोने सापडले

मुंबई : वृत्तसंस्था

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलं जातंय. एकूण सहा जणांना विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. छुप्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत परदेशी नागरिकावर अटकेची कारवाई करण्यात आल् आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाची तपासणी केली. तेव्हा या प्रवाशाने चक्क एका विशिष्ट प्रकारच्या बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं निदर्शनास आलं. अखेर कस्टम विभागाकडून याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच सोनंही हस्तगत करण्यात आलंय.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिकांनी एक विशिष्ट प्रकाराचा तयार केलेला बेल्ट परिधान केला होता. या बेल्टबाबत शंका आली म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं आढळलं. या सोन्याचं वजन केलं असता, तब्बल 12 किलो सोनं असल्याचं तपासाअंती निष्पन्न झालं.
जप्त करण्यात आलेल्या 12 किलो सोन्याची किंमत तब्बल 5 कोटी 38 लाख रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही प्रवाशांकडून सोनं लपवून नेणाऱ्यास मदत करण्याचे प्रयत्न सुरु होते. पण अखेर कस्टम विभागाच्या रडारमध्ये हे सगळेजण सापडलेत. एकूण सहा जणांना कस्टम विभागाने अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांची आता कसून चौकशी केली जाते आहे.

Previous Post

म्हसावदच्या युवा धावपटूचा विशाल देवकर यांच्या हस्ते गौरव

Next Post

जळगावच्या व्यापाऱ्यांनी केली फैजपूरच्या सोसायटीची ४ कोटीचा अपहार

Next Post
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

जळगावच्या व्यापाऱ्यांनी केली फैजपूरच्या सोसायटीची ४ कोटीचा अपहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group