Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काव्यरत्नावली चौकात 4284 ‘श्रीं’च्या मुर्त्यांचे संकलन
    Uncategorized

    काव्यरत्नावली चौकात 4284 ‘श्रीं’च्या मुर्त्यांचे संकलन

    editor deskBy editor deskSeptember 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रींच्या मुंर्तीचे संकलन केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रावर जळगाव शहरातील 4284 घरगुती श्रींचे संकलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक येऊन स्वत:च्या घरची श्रींची मुर्ती विसर्जनासाठी अर्पण केली.

    सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर संकलन केंद्र नागरीकांच्या सेवेत सुरू होते. ट्रक व ट्रॅक्टर यांच्या 9 फेऱ्या करून या मुर्तींचे विधीवत मेहरूण तलावावर विसर्जन करण्यात आले. यावेळी 5 ट्रॅक्टर निर्माल्य संकलीत झाले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष पियुष हसवाल, गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रितम शिंदे, हर्षल तेली, समिर कावडीया, भवानी अग्रवाल, सयाजी जाधव, संस्कृती नेवे, चेतना जैन, विराज कावडीया, अमित जगताप, भटू अग्रवाल, राहूल चव्हाण, सौरभ कुळकर्णी, प्रशांत वाणी, तेजस श्रीश्रीमाळ, जय जैन, मनोज चव्हाण, विपीन कावडीया, सागर सोनवणे, राहूल ठाकून, ऋषिकेश देशमुख, अजय खैरनार, तृषांत तिवारी कन्हैय्या सोनार, यश लोढा, यश श्रीश्रीमाळ आदि. युवाशक्तीच्या स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.

    दिवसभरात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, पोलीस अधिक्षक लिलाधर कानडे, विजय शिंदे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संकलन केंद्राला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

    10 दिवस श्रद्धा भावाने पूजन केलेले श्रींची मुर्ती शहरातील 4284 कुटुंबांनी विधीवत विसर्जन करण्यासाठी आम्हाला देऊन नागरिकांनी युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यावर जो विश्वास दाखविला आम्ही ऋणी आहेत अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. या उपक्रमाला जळगाव शहर मनपा व जळगाव जिल्हा पोलीस दल यांचे अनमोल सहकार्य लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.