चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका महिलेस मुलगी झाल्यामुळे तसेच रसवंतीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरून २ लाख रुपये आणावे, या कारणासाठी नेहमी पैशाची मागणी करीत पिडीतेला नेहमी मारहाण व शिवीगाळ तर मानसिक त्रास दिल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील अकुलखेडा येथील माहेरवाशीण असलेल्या सौ.माया सोमनाथ नन्नवरे (वय ३३,धंदा- घरकाम रा. पुणतांबा ता.राहाता जि अहमदनगर ह. मु. अकुलखेडा ता चोपडा) यांचा २०१६ मध्ये पुणतांबा येथील सोमनाथ शांताराम नन्नवरे यांच्याशी रीतीरीवाजाप्रमाने विवाह झालेला आहे. त्यानंतर पहिली मुलगी झाल्याचा राग मनात ठेवून सोमनाथ नन्नवरे पती, शांताराम पांडुरंग नन्नवरे सासरे, मथुराबाई शांताराम नन्नवरे सासू, रमेश शांताराम नन्नवरे जेठ (सर्व रा.पुणतांबा ता राहाता जि अहमदनगर) यांनी वेळोवेळी पिडीतेला रसवंती व्यवसायाकरीता तसेच फिर्यादीच्या उपचाराकरीता न माहेरहुन २ लाख रुपये आणण्याची मागणी करून मारहाण व शिवीगाळ करीत मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पिडीतेने दि ९ रोजी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तप्पास पोहेकाँ प्रदिप राजपुत हे करीत आहेत.