लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या सोमवारी दुपारी दोन वाजता अजिंठा विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठक होणार आहे.
परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चेअरमन पदाचे स्वप्न असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व सहकारात आहे ऐनवेळी भाजपनेते गिरीश महाजन हे राजकीय खेळी खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव महापालिकेत भाजपा शिवसेना युती होणार असेच शेवटपर्यंत शिवसेनेला गाफील ठेवून ऐनवेळी भाजपाने सर्व जागा लढून शिवसेनेला पराभूत केले हीच खेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खेळण्याची दाट शक्यता असून मराठा कार्ड पुढे करून राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्याला सोबत घेऊन जिल्हा बँक निवडणुकीची खेडी खेळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे मुंबई ते पुणे या प्रवासादरम्यान आमदार महाजन सोबत ही चर्चा झाली असल्याचे िश्वसनीय सूत्रांकडून समजते सोमवारी सर्वपक्षीय बैठक असली तरी ही बैठक केवळ निमित्त मात्र ठरू नये एवढे मात्र निश्चित.