धरणगाव : प्रतिनिधी
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले याचे अजूनपर्यंत शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही तर अनुदानही दिलेले नसल्यामुळे धरणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
गतवर्षी २०२१-२०२२ या वर्षामध्ये गंगापुरी व तालुक्यातील गावामध्ये अतीवृष्टी झाली होती. त्यामुळे सोनवद महसूल मंडळातील गंगापुरी परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने त्याचे नुकसानीचे पंचनामे करून अनुदान देखील तालुक्यातील काही मंडळांना मिळाले पण आपल्या महसूल मडळाला अजून एक पण हफ्ता मिळाले नाही. तालुक्याचे शेतकरी तालुक्याचे नेते राजेन्द्र किसन पाटील यांनी धरणगाव तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्री सातपुते यांना शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. सोबत कृषी विभाग धरणगाव यांना देखील निवेदन देण्यात आले.
यावेळी राजेन्द्र किसन पाटिल, विकास काशिनाथ पाटील, हेमकांत्त माधवराव पाटील, प्रदीप शिवाजी पाटिल, दीपक मधुकर पाटिल, दिनकर राजेन्द्र पाटील,कृषी कन्या अंशु दिनकर पाटील ,उखडवाडी चे सरपंच गणेश पाटील, भांबर्डीचे शेतकरी सोनवदचे शेतकरी, तरडेचे शेतकरी ,पष्टानेचे शेतकरी आदी पंच क्रोशीतील शेतकरी यावेळी उपस्थित होते.