• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात महिलेचा खून : संशयित आरोपी पतीला अटक

मुलबाळ नसल्याने पत्नीच्या चारित्र्याचा संशय

editor desk by editor desk
September 9, 2022
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरात महिलेचा खून : संशयित आरोपी पतीला अटक

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील मुंबई गल्लीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते, त्यामुळे ८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनव पती देविदासने केला. अगदी पोलिसात खबर देतांना त्याने आत्महत्यानंतर ती खाली पडून आली असेही नमूद केले. तसेच योगिता वरून खाली पडून आली असे सांगितले जात होते मात्र वरून पडल्याने लागलेल्या काहीच जखमा अथवा चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे योगीताचा खून झाल्याची खात्री भाऊ दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्ल्यायानुसार आज पहाटे पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

देविदास उर्फ सूर्यकांत याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करतो मुलबाळ नसल्याने तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला मारहाण करीत होता. दोन तीन दिवसांपूर्वी योगिता चलथान सुरत येथे मामाच्या घरी गेली असताना पतीने नातेवाईकांकडे तिची बदनामी सुरू केली होती म्हणून योगिता गैरसमज दूर करण्याकरिता पुन्हा पतीकडे परत आली होती, अशी माहिती देखील समोर येत आहे. परंतू मयत विवाहितेचे भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व इतरांनी प्रत्यक्ष पाहिले असता योगीताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण होते. तसेच गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा होत्या आणि तिच्या नाकातून देखील रक्त बाहेर आलेले होते. धक्कादायक म्हणजे वर छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही, की ज्यामुळे योगीताचे प्रेत खाली पडले होती, हे सिद्ध होईल. परंतू पतीने आपला बचाव करतांना आत्महत्या केल्यानंतर पत्नीने बचाव करत असतांना स्वत:ची नखे लागली असावीत असे सांगितले. परंतू याची खात्री करण्यासाठी नखे तपासली असता ती वाढलेली नव्हती व चालूच कापलेली आढळून आली.

Previous Post

जळगावात दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू

Next Post

पष्टाणेत एकाच घरात ५ लाखांची चोरी

Next Post
धरणगाव तालुक्यात धाडसी चोरी : ३ घरे फोडली तर एक दुकान…

पष्टाणेत एकाच घरात ५ लाखांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group