चोपडा : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तांत्रिक चुकीमुळे एम.एस.डब्ल्यू अंतिम वर्षाच्या वार्षिक परीक्षेत सोशिअल वेल्फेअर अँड सोशिअल जस्टिस या एकाच विषयात सर्वच समाजकार्य महाविद्यालयांचे सर्वच विद्यार्थी नापास झाले आहेत. याशिवाय रूरल अँड ट्रायबल मूव्हमेंट इन इंडिया या विषयाची परीक्षा दिलेले चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाचे एकाच विषयात ५३ विद्यार्थी नापास दाखविले आहे. सोशल जस्टीस या विषयाचे चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील ५३ विद्यार्थी नापास झाले आहेत. क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत समाजकार्य अभ्यासक्रमाचे पाच महाविद्यालय आहेत. विद्यापीठात देखील समाजकार्य विभाग आहे. समाजकार्य महाविद्यालयांचा अंतिम वर्षांचा निकाल १ सप्टेंबरला विद्यापीठाने ऑनलाइन जाहीर केला. सुधारीत निकालही ‘जैसे थे या निकालात जवळपास सर्वच विषयात सर्वच विद्यार्थी नापास दर्शवण्यात आले आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर निकालातील चुका दुरुस्त करून दुपारी पुन्हा ३.३० वाजता नवीन निकाल जाहीर झाला. मात्र, त्यातही तांत्रिक चुका ‘जैसे थे’ होत्या. सोशिअल वेल्फेअर अँड सोशिअल जस्टिस या विषयात सर्वच विद्यार्थी नापास दाखविले आहेत.
येत्या दोन दिवसात होणार दुरुस्ती !
विद्यापीठांतर्गत येणाच्या चौपड़ा, अमळनेर, मोराणे, तळोदा, जळगाव आणि विद्यापीठ समाजकार्य विभाग या सर्वच महाविद्यालयाच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने विद्यापीठाची या तांत्रिक चूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विद्याथ्यांच्या संघटनांनी पाठपुरावा केला असून, विद्यापीठाने देखील चूक मान्य करत महाविद्यालयाकडून विद्याथ्याचे दुरुस्ती प्रस्ताव मागवले आहेत. विद्यापीठांतर्गत कार्यरत असणाच्या समाजकार्य विभागातील विद्याथ्र्यांबाबत ही चूक विद्यापीठाने दुरुस्ती केली असून, पुढील दोन दिवसात सर्व विद्याथ्र्यांचे पेपर पुन्हा तपासून तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.