धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पष्टाणे आणि कल्याणे होळ गावातील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यानुसार चोरट्यांनी तबब्ल ३ लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणी पहिली फिर्याद वर्षाबाई वनसिंग पाटील (वय ४६, व्यवसाय – शेती रा.कल्याण होल ता.धरणगाव) यांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्या राहते घरास कुलुप लावुन त्या माहेरी गेलेले होते. दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजीचे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर ४६ हजार किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.
तर दुसऱ्या फिर्याद भूषण दिलीपराव देसले (वय ३३ धंदा खाजगी नोकरी रा.पष्टाणे ता.धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भूषण पाटील हे पत्नीश त्याच्या पायाचे ऑपरेशन झालले असल्याने जळगाव येथील डॉक्टर यांना दाखविण्यासाठी गेले होते. रात्री दवाखान्यात उशीर झाल्याने ते जळगाव येथे नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांना वडील दिलीपराव देसले यांचा फोन आला की आपल्या घरी रात्री चोरी झाली आहे. घरी आल्यानंतर वडील यांनी सांगीतले की, रात्री ८ वाजेच्या सुमारास ते व आई शोभाबाई असे जेवन करुन घराच्या मागच्या टप्यात म्हशीवर लक्ष ठेवण्यासाठी झोपले होते. सकाळी ४ वाजता उठल्यावर त्यांनी पाहीले की, घरातील पुढील दरवाज्याचे कुलुप तोडलेले होते व घरातील सामान आस्ताव्यस्थ पडलेला होता. घरातील गोजरेज कपाट पाहीले असता कपाट उघडे होते व त्यातील सोन्या-चांदीचे दागीने व दुधाचे ठेवलेले पैसे असा एकूण २ लाख ६५ हजराचा ऐवज गायब होता. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. राहुल खताळ हे करीत आहेत.