चोपडा : प्रतिनिधी
शहरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी परिसरातून एकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना दि ३१ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी चोपडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील रहिवासी कैलास रामदास बारी (वय ५६) हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. हे दि ३१ रोजी रात्री आपले काम आटोपून घरी येवून झोपून गेले. घराबाहेरील अंगणात लावलेली एम.एच.१९.बी.एच.३६२० दुचाकी रात्री कुणी तरी चोरून नेल्याची घटना १ रोजी उघडकीस आली. त्यांनी परिसरात व मित्र परिवारामध्ये शोध घेतला पण दुचाकी मिळून न आल्याने चोपडा शहर पोलिसात धाव घेवून चोरीचा गुन्हा नोंद केला आहे . पुढील तपास पोना. किरण गाडीलोहार हे करीत आहे.