मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज शिवसेना कुणाची यावर निकाल लागणार होता पण निकालाची तारीख आता २७ सप्टेबर झाली असून यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या असून आज सकाळी शंभुराज देसाई यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, ‘बाळासाहेब ठाकरे’ ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर विचार आहेत. आणि आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वासदार जरूर असतील. पण आम्ही वैचारिक वारसादार आहोत. चिन्हं रुजवायला वेळ जाईल. पण आमची शिवसेना शाखांपर्यंत जाईल”, असं शंभुराज देसाई म्हणालेत. “चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडे आहे. आमदार खासदार नगरसेवक सरपंचाचं बहुमत आमच्याकडे आहे. लोकांमधून आलेले लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्हं मिळेल अशी आशा आहे. आम्हाला कोर्टाकडे अपेक्षा आहे”, असंही ते म्हणाले आहेत.
धनुष्यबाणावर काय म्हणाले?
चिन्हं नाही मिळालं तर सर्व बाजूने आमची तयारी आहे. ज्वलंत हिंदुत्व कुणाकडे आहे हे लोकांना माहीत आहे. आमचं हजारो लोकांनी स्वागत केलं. लोकं आमच्या स्वागताला आजही येत असतात. शिंदे जातात तिथे लोक येत असतात. आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आहेत, असं म्हणत धनुष्यबाण आमचाच असल्याचं शंबुराज देसाई यांनी ठणकावून सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे निर्णय घेतील तो मान्य आहे. शिंदेंसोबत आम्ही 40 आमदार आहोत. जो निर्णय घ्यायचा तो अधिकार शिंदे यांना दिले आहे. हिंदुत्वावादी मतांचं विभाजन होऊ नये हे आम्हाला वाटतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना आमचा फुल सपोर्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.