Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बारावी पास आहात लेखी परीक्षेची गरज नाही मिळवा सरकारी नोकरी
    राष्ट्रीय

    बारावी पास आहात लेखी परीक्षेची गरज नाही मिळवा सरकारी नोकरी

    editor deskBy editor deskSeptember 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भारतीय रेल्वेने 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी कोणत्याही परीक्षेविना थेट भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया स्पोर्टस् कोट्यातून करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. तेव्हा वाट कसली पाहता, लगेचच अर्ज करा..
    इथं करा अर्ज
    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीन आठवड्यांहून अधिक दिवस मिळणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. https://www.rrc-wr.com/ या लिंक, संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता.
    शैक्षणिक पात्रता
    या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अट जाहीर करण्यात आली आहे. पदवीच्या दुसऱ्या अथवा अंतिम वर्षाला असणारा, इयत्ता 12वीं उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येईल. या पदासाठीची निवड ही खेळातील तुमच्या प्राविण्यावर अवलंबून राहिल. तसेच तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेचाही विचार होईल.
    वयोमर्यादा
    या पदासाठी अर्जदार उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असायला हवे.
    अर्जासाठी शुल्क
    खुला आणि ओबीसी प्रवर्ग- 500 रुपये
    एससी,एसटी, महिला, आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग – 250 रुपये

    वेतन किती असेल
    या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 25500-81100 / 29200- 92300 रुपये वेतन मिळेल.

    या पदासाठी भरती
    रेसलिंग (पुरुष) फ्रीस्टाइल – 1, शूटिंग (M/W) एअर पिस्टल / स्पोर्ट्स पिस्टल/ राइफल शूटिंग 3 पद /राइफल शूटिंग प्रोन -1 , कबड्डी – ऑलराउंडर – 01, हॉकी – 02, स्तर-2 आणि स्तर-3 – 16, वेटलिफ्टिंग 02, पावरलिफ्टिंग -1, पावर लिफ्टिंग- 1, रेसलिंग – 01, शूटिंग – 01, कबड्डी- पुरुष – 01, कबड्डी – महिला – 2 हॉकी पुरुष – 01 जिमनॅस्टिक पुरुष – 02 क्रिकेट पुरुष – 02 क्रिकेट महिला – 1
    या लिंकवर थेट अर्ज पाठवा
    https://www.rrc-wr.com/rrwc/Files/195.pdf

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    भोंदू खरात प्रकरणाचा राजकीय आवाज: सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप

    March 21, 2026

    अखेर रुपाली चाकणकरांनी सोपविला उपमुख्यमंत्री पवारांकडे राजीनामा !

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.