Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तुमच्या बापाने कधी शेकोट्या पेटवल्या नाही तुम्ही काय…
    राजकारण

    तुमच्या बापाने कधी शेकोट्या पेटवल्या नाही तुम्ही काय…

    editor deskBy editor deskSeptember 6, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था

    ज्यांच्या बापानं कधी शेकाेट्या पेटविल्या नाहीत ते महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत आहेत. ज्यांनी कधी थप्पड मारली नाही ना खटमल मारलं. तुम्ही काय करणार बघूनच घेताे. आम्ही ठरवलं असतं तर त्याच दिवशी दाेनशे तीनशेंचा बंदाेबस्त झाला असता. ज्यांना … आली असेल त्यांनी या त्याची व्यवस्था करताे मी असा प्रहार व इशारा आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांना आज पुन्हा एकदा दिला आहे.

    आमदार गायकवाड यांनी नुकतेच चून चून के मारेंगे अशी धमकी ठाकरे गटास अप्रत्यक्ष दिली हाेती. त्यास ठाकरे गटानं प्रत्युत्तर देताना आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या नादाला लागू नकोस असं उत्तर दिलं हाेते. तसेच बुलढाणा येथील काही नेत्यांनी आमदार गायकवाडांना चॅलेंज देखील दिलं. त्यावर आज आमदार गायकवाड यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना समज वजा एक प्रकारे धमकीच दिली.

    आमदार गायकवाड म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असाे अथवा आमचे अन्य नेते त्यांच्यावर जिल्ह्यात हाेणारी टीका आम्ही सहन करणार नाही. त्या दिवशी आमचे कार्यकर्ते त्यांना भारी पडले असते पण आम्हांला तंटा नकाे हाेता, लक्षात आलं का. ज्यांना खूमखूमी आहे त्यांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील.
    मी मैदानातील मर्द माणूस आहे. तलावारी, अंगावर झेललाे आहे तुम्ही काय केलं. पस्तीस वर्ष संघर्ष केला आहे मी. विनाकारण डिवचू नका. आम्हांला सत्तेचा माज आलेला नाही. जातीची परवानगी घेतली हाेती आम्हांला बाेलताना असंही आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही जात पात मानत नाही असेही गायकवाडांनी स्पष्ट केले.
    माझ्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून बुलढाणा जिल्ह्यात येथे काही ठिकाणी माेर्चा निघाले. ते मी पाहिलं काही ठिकाणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हाेते. त्याला माेर्चा म्हणावे का असा प्रश्न मला पडला. तुम्ही तक्रार देत नाही आणि पाेलिसांकडून कारवाईची मागणी करता. जालिंदर भुजबळ यांस जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मी दिलं. कृषी उत्पन्न समितीवर संचालक केले. ज्यावेळेस त्यांना माजी आमदार मारायला जात हाेते त्यावेळी मी त्यांना वाचविण्यास जात असे असे गायकवाडांनी नमूद केले.
    आमच्या बद्दल बोलेल त्याला चोपणारच. माझ्यावर १५० केसेस, ०४ वेळा तडीपार झालो, MPDA सुद्धा लागला, माझ्या नादी लागू नका असेही आमदार गायकवाड यांनी नमूद केले. ते म्हणाले बाळासाहेबांच्या एका शब्दाला आम्ही मरायला तयार असायचाे. त्यामुळं कूठं यायचे, कधी यायचे ते सांगा असं आव्हान आमदार गायकवाडांनी ठाकरे गटाच्या समर्थकांना दिले.
    दरम्यान आमदार गायकवाड यांनी खासदार नवनीत राणांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर त्यास त्यांचे कार्यकर्ते उत्तर देतील. प्रत्येक गाेष्टींसाठी आम्हीच कशासाठी असे एका प्रश्नावर नमूद केले. ते म्हणाले ज्याने त्याने आपआपलं बघावं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.