अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील प्रताप महाविद्यालयात विद्यार्थाकडून प्रवेश प्रक्रीये दरम्यान विविध सुविधेच्या नावाखाली शुल्क आकारले जात असल्याचा निषेध आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने आज सकाळपासून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांच्या नेतृत्वाखाली य्या आंदोलन सुरु केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहातील प्रताप महाविद्यालयात सुमारे साडे पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण याच गणित केलं तर आपल्याला लक्षात येईल की एका वर्षाला महाविद्यालयाकडे जिमखानेच्या नावाखाली दर वर्षी साडेआठ ते नऊलाख रुपये गोळा होतात. सदर जिमखाना तीन ते चार वर्षांपासून बंद आहे धुळीत माखलेला आहे. राष्ट्रवादीने याच प्रश्नवर बोट ठेवत महाविद्यालय प्रशासनाला आहे की तीन ते चार वर्ष जिमखाना जर बंद आहे तर आपण विद्यार्थ्यांकडून कुठल्या बेस वर शुल्क आकारत आहात. र एका महिन्यात सदर जिमखाना व त्यातील मशिनरी रिपेर करून नव्याने सुरू करण्याचे आश्वासन या वेळी विद्यार्थ्यांना प्राचार्य महोदयांनी दिलेये. का महिन्यात जिमखाना सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेले संपूर्ण शुक्ल त्यांना परत देण्यात यावे अश्या प्रकारची भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी गायकवाड, विद्यार्थी संघटनेचे कृष्णा बोरसे, गौरव पाटील, अतुल भदाणे,रोहन पाटील,आयुष पाटील,दीपक पाटील व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.