मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जाणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
शिंदे गटाकडून यासंदर्भात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल देण्याची मागणी शिंदे गट आज कोर्टात करणार आहे. शिंदे गटाकडून त्यांचे वकील आज सुप्रीम कोर्टामध्ये तशी विनंती करणार आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. पण त्याआधीच सूनावणी सुरू व्हावी, असी विनंती शिंदे गट करणार आहे. निवडणूक आयोगाने 23 सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिलेली आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा मानला जात होता कारण, त्यांना कागदपत्रे सादर करण्याठी चार आठवड्यांचा कालावधी मिळाला होता.
येत्या कालावधीत राज्यात महापालिका निवडणूका आहेत. शिवाय अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. त्याअगोदरच शिवसेना चिन्ह आणि पक्षाचा निकाल लावणे आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता करावी. अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.