जळगाव : प्रतिनिधी
शहरातून आंतरजिल्हा तसेच ग्रामीण भागात जळगाव बस डेपो येथून जात असलेल्या बसेससाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करीता नियमीत बसेस सुरू करणे तसेच याठीकाणी बसेस थांबण्यासाठी थांबा देण्याची मागणी आज राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आगार प्रमुखांना निवेदन देवून मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करीता नियमीत बसेस सुरू करणे तसेच नियमित जाणारे बसेसला सकाळी ९ वाजता दुपारी २ वाजता आणी दूपारी ५ वाजेला विद्यार्थी हित लक्षात घेवून बस सुरू करावी, तसेच धुळे व नंदुरबार येथून विद्यापीठ करता येणारे विद्यार्थी यांना विद्यापीठ थांबा न देता आपल्या बसेस सरळ निघून जातात त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी आपण त्वरीत बस सुरू करून विद्यापीठ साठी थांबा मिळावा ही नम्र विनंती. सदरील निवेदनाचा काळाजी पूर्वक विचार करून व त्वरित विद्यापीठ साठी बसेस चालू कराव्या अन्यथा त्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल असे निवदेन आगार प्रमुख यांना देण्यात आले. याप्रसंगी रावेर लोकसभा अध्यक्ष विद्यार्थी गौरव वाणी, प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे, मा.जिल्हा अध्यक्ष कुणाल पवार, गणेश निंबाळकर, जीवन जगताप, रुपेश सुर्यवंशी, प्रसाद पाटील, मयूर जैन यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.