धरणगाव : प्रतिनिधी
येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शिक्षण क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुड शेपर्ड स्कुलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर स्कुल हेड बॉय – हेड गर्ल तसेच ग्रीन, रेड, एलो, ब्लू हाऊसचे कॅप्टन यांना बॅच देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आज ज्या शिक्षकांची भूमिका निभावली त्या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नर्सरी ते दहावीच्या अनेक विद्यार्थांनी तसेच शिक्षक बनलेल्या विद्यार्थांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. काही विद्यार्थांनी गीत, नृत्य, नाटिका यातून आपल्या भावना व्यक्त करून प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थांना याप्रसंगी भेटवस्तू देण्यात आल्या. काही शिक्षकांनी देखील शिक्षक दिनाचे महत्व तसेच शिक्षकांची भूमिका याबाबत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजुका भदाणे यांनी केले.