धरणगाव : प्रतिनिधी
येथील ना. गुलाबराव पाटील गणेश मित्रमंडळच्या वतीने गणेशोत्सव निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ११ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
ना. गुलाबराव पाटील गणेश मित्रमंडळच्या वतीने गणेशोत्सव निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सोलो – २००, कपल-३०० आणि ग्रुपसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. तर प्रथम बक्षीस ११ हजार, द्वितीय ८ हजार, तृतीय बक्षीस ५ हजार तर उत्तेजनार्थ बक्षीस ३ हजार रुपये असणार आहे. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ होणार असून अधिक माहितीसाठी जॉनी महाजन (मो.८८८८९६०२७७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.